जिल्हा

मुंबईच्या कांदिवलीत इमारतीला भीषण आग, चिमुकल्यासह दोन जणांचा होरपळून मृत्यू तर तीन जखमी

 

भरत पवार – शहर प्रतिनिधी नालासोपारा

मुंबई : मुंबईतील आगीच्या घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. कांदिवली महावीरनगर येथील वीणा संतूर बिल्डिंगमध्ये भीषण आग लागली. या भीषण आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झालेत. होरपळून मृत्यू झालेल्यांमध्ये एका आठ वर्षाच्या चिमुकल्याचा समावेश आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून, सध्या कुलिंगचं काम सुरु आहे. आगीचे कारण अद्याप समोर आले आहे. या आगीमुळं नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक याचा तपास करत आहेत.

कांदिवली येथील वीणा संतूर इमारतीला ही आग लागली होती. इमारतीच्या ग्राउंड प्लस पहिल्या मजल्यावर ही आग लागली. लेवल एक प्रकारची असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळ गाठून आग विझवण्याचा प्रयत्न केला. या आगीत अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!