जिल्हा

3 ते 10 डिसेंबरमध्ये जिल्ह्यात दिव्यांग सप्ताहाचे आयोजन

 

बंटी पाटील – उपजिल्हा प्रतिनिधी रायगड 

रायगड दि – 3 जागतिक दिव्यांग दिन 3 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा रुग्णालय रायगड अलिबागच्या माध्यमातून 3 ते 10 डिसेंबरमध्ये जिल्ह्यात दिव्यांग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कालावधीमध्ये विविध ठिकाणी दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्याचा लाभ दिव्यांग बांधवांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी केले आहे.

दिव्यांग बंधू भगिनींच्या उत्कर्षासाठी ग्रामपंचायत स्तरापासून अनेक योजना शासनाच्या माध्यमातून राबविल्या जातात. तसेच विद्यार्थ्यांकरिता परीक्षेत वेळेची सवलत, प्रवासासाठी सवलत अशा अनेक सुविधांचा लाभ बांधवांना घेता येतो. परंतु त्याकरिता दिव्यांग वैश्विक ओळखपत्र (UDID) त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अंबादास देवमाने यांच्या मार्गदर्शनाने दि. 6 डिसेंबर रोजी जिल्हा रुग्णालय, अलिबाग, दि. 7 डिसेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय, माणगाव, दि. 9 डिसेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय, महाड येथे तर दि. 11 डिसेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय, म्हसळा व दि. 15 डिसेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय, श्रीवर्धन येथे अस्थिव्यंग, नेत्र, मानसिक आजाराविषयी विशेष दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या व्यतिरिक्त अस्थिव्यंग, नेत्र, कर्ण-मुक बधीर, भिषक व मानसिक आजाराविषयी दर बुधवारी जिल्हा रुग्णालय- अलिबाग तसेच दर शुक्रवारी उप जिल्हा रुग्णालय – पनवेल, आणि प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उप जिल्हा रुग्णालय- माणगाव येथे नियमित दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येते.

सदर तपासणी शिबीराकरिता उपस्थित राहताना लाभार्थ्यांनी www.swavlambancard.gov.in या वेबसाइड वर आपले नाव नोंदणी करून त्या अर्जाची प्रत, आधारकार्ड, रेशन कार्ड, दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र व आधी केलेल्या उपचारांची सर्व कागदपत्रे सोबत आणावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!