बसच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू, संतप्त जमावाने बस पेटवली; घटनास्थळी पोलीस दाखल
दशरथ थोरवे – जिल्हा प्रतिनिधी सोलापूर
छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील चितेगाव येथील पांगरा रोडवर एक धक्कादायक घटना घडली आली असून, आईसोबत चॉकलेट आणण्यासाठी निघालेल्या एका चार वर्षीय मुलाचा शाळेच्या बसच्या धडकेने अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.
या घटनेनंतर संतप्त जमावाने बसची तोडफोड करून बस पेटवून दिली, या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, अग्निशमक दळाच्या मदतीने आग विजवण्यात आली.
या अपघातामध्ये मध्ये शाहरुख पठाण वय 4 वर्षे असे मयत झालेल्या मुलाचं नाव आहे, तर या अपघातात मुलाची आई देखील जखमी झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील चितेगाव येथील पांगरा रोडवर चार वर्षांचा शाहरुख पठाण आपल्या आईचा बोट धरून किराणा दुकानात जात होता. या वेळी तिथून जाणाऱ्या एका शाळेच्या बसने आई आणि मुलाला जोराची धडक दिली. ज्यात आई गंभीर जखमी झाली तर शाहरुख पठाण बसच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी तात्काळ अपघातग्रस्त आई आणि मुलाला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी मुलाला मयत घोषित केले.



