तालुका

नायक मराठा समाज सेवा संघ दादली – किंजळघर यांच्यावतीने हळदीकुंकू समारंभ संपन्न

हिंदू धर्माची संस्कृती जोपासण्यासाठी अशा कार्यक्रमातून महिलांनी एकत्र येणे गरजेचे - सुषमाताई गोगावले

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड

महाड : महाड मधील नायक मराठा समाज सेवा संघ दादली – किंजळघर यांच्यावतीने सालाबाद प्रमाणे हळदीकुंकू समारंभ आयोजिन करण्यात आले होते.

हळदीकुंकू समारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य सुषमाताई भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी सुषमाताई गोगावले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की सध्याची तरुण मुलं – मुली ही बॉलीवूड सिनेमा कडे जास्त आकर्षित होत असून ते पाहून त्याच पद्धतीने वागत आहेत, तीच सध्याची फॅशन झाली आहे, हे जग विज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रात प्रगती करत असले तरी आपण आपले पिढ्यान पिढ्या जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांपासून चालत आलेले रूढी, परंपारा, संस्कार अणि हिंदू संस्कृती विसरता कामा नये याची आपण जाणीव ठेवणे गरजेचे आहे, आपण आपल्या सौभाग्याच लेन टिकून राहावं, आपल्या सौभाग्याला दीर्घायुष्य लाभाव म्हणून आपण हे पारंपारिक सामाजिक कार्यक्रम आयोजित करत आहोत अशा कार्यक्रमामुळे समाजातील महिला भगिनी एकत्र येतात यामुळे विचारांची देवाण – घेवाण होते, या कार्यक्रमाला आपणास शुभेच्छा, असेच कार्यक्रम आपल्या समाजाच्या हातून घडत राहो, आपणास लागेल ते सहकार्य आमदार साहेबांकडून आणि माझ्या परीने होईल ते नक्कीच करता येईल तेवढे आम्ही करू से उपस्थित महिला भगिनींना सांगितले.

यावेळी नायक मराठा समाज सेवा संघ दादली – किंजळघर येथील पदाधिकारी, सदस्य, महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!