आर्थिक आणि डिजिटल साक्षरता अभियान सन २३ – २४ नागांव येथे संपन्न
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड : दि 18 जानेवारी रोजी महाड तालुक्यातील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक शाखा विन्हेरे विस्तारीत कक्ष नागांव शाखेच्या वतीने नागांव महाड येथे नाबार्ड अंतर्गत ग्रामीण भागातील बचतगटातील महिला व शेतकरी यांच्या करिता आर्थिक आणि डिजिटल साक्षरता अभियान कार्यक्रम घेण्यत आले होते.
यावेळी उपस्थित महिलांना बँकेचे शाखाधिकारी नितिन चांदोरकर यांनी बँकेच्या विविध योजनाची माहिती दिली, तसेच बचत गटाच्या महिलाना कर्ज देण्यात असल्याची माहिती त्यांनी महिलांना दिली. बचत गटाच्या माध्यमातून महिलाना सक्षम करण्यासाठी विविध व्यवसायासाठी कर्ज देण्यात येईल असे सांगण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना देखील शेती विषयी लागणाऱ्या कर्जाची माहिती देण्यात आली, पंतप्रधान जीवन ज्योति योजना पंतप्रधान विमा सुरक्षा योजना, पीएम किसान योजने अंतर्गत लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना केसीसी कर्ज वाटप योजनांची माहिती उपस्थित सर्व शेतकऱ्यांना देण्यात आली. आपल्या भागात बैंक आल्याने ग्राहकांनी महिला वर्ग व शेतकरी वगनि योग्य तो लाभ घेऊन बँकेला सहकार्य करून स्वतःचा उत्कर्ष करून घ्यावा.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन मनोहर पुनाजी सकपाळ व आभार प्रदर्शन कॅप्टन मनोहर काशीराम जाधव यांनी मानले.
या वेळी बँकेचे शाखाधिकारी नितिन चांदोरकर, कॅशियर चंद्रकांत मेंगाळ, गावातील सरपंच संजय सखाराम चिंचघरकर, उपसरपंच संतोष मनोहर सकपाळ, कॅप्टन मनोहर पुनाजी सकपाळ, कॅप्टन रणजीत गुनाजी सकपाळ, मोहन गोविंद सकपाळ, काशीनाथ सकपाळ, कॅप्टन मनोहर काशीनाथ जाधव, विजया किरण सकपाळ, माजी सरपंच अनीता प्रकाश सकपाळ, लक्ष्मी दीपक उत्तेकर, सुमति रामचंद्र सकपाळ छाया हरिश्चंद्र सकपाळ, महिला व शेतकरी वर्ग ई. मान्यवर उपस्थित होते.



