जिल्हा

पदमदुर्ग किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी निधी कमी पडू देणार नाही, तातडीने जेट्टी उभारण्याचे आदेश – आमदार महेंद्रशेठ दळवी

 

विवेक चाफेकर – तालुका प्रतिनिधी मुरुड – जंजिरा

मुरुड – जंजिरा : मुरुड पर्यटन महोत्सवात पदमदुर्ग किल्ल्याची दुरुस्ती करण्याचा मी शब्द दिला होता आणि लगेचच दिलेल्या श्बादाची पूर्तता करत पदमदुर्ग किल्ल्याला भेट देऊन प्रत्यक्ष पहाणी केली व उपस्थित अधिकारी वर्गाला पदमदुर्ग किल्ल्यावर पर्यटकांना सहज उतरता यावे यासाठी तातडीने जेट्टीची उभारणी करण्याचे आदेश दिले. त्याच प्रमाणे किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी कोणताही निधी कमी पडू देणार नसून अधिकारी वर्गाने तातडीने प्रस्ताव तयार करून संबंधित खात्याकडे पाठवा त्याचा मी स्वतः पाठपुरावा करून निधी व कामाची मान्यता आणून देईन असे प्रतिपादन आमदार महेंद्रशेठ दळवी केले.

पदमदुर्ग किल्ल्याला प्रथमच भेट देऊन एक नवा इतिहास रचला आहे.या आगोदर असणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री यांनी कधी हि या किल्ल्याला भेट दिली नव्हती किंवा या किल्ल्या विषयी कोणतीही आस्था दाखवली नव्हती. परंतु या भेटीने पुरातत्व अधिकारी व मेरीटाईम बोर्ड अधिकारी यांच्या समवेत किल्याच्या विकासाचा मार्ग मोकळा केला आहे.

यावेळी खासदार सुनीलजी तटकरे, मुंबई विभागाचे पुरातत्व खात्याचे अधीक्षक शुभम मुजुमदार, महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाचे उप अभियंता डी. वाय. पवार, मुरुड पुरातत्व खात्याचे प्रमुख बजरंग एलीकर, पदाधिकारी, अधिकारी तथा आदी मान्यवर उपस्थित होते.

पुरातत्व खात्याचे अधीक्षक शुभम मुजुमदार यांना पहिल्या टप्प्यात सर्वप्रथम किल्ल्यावर मोठी जेट्टी उभारा तदनंतर किल्ल्याच्या आतील भागाची दुरुस्ती त्वरित करा तसेच किल्याच्या लाकडी प्रवेशद्वार भव्य व मोठे बनवा, किल्ल्याच्या आतील तोफा या फार गंजल्या आहेत त्यावर रासायनिक प्रक्रिया करून त्यांचे आयुष्य वाढवा.किल्ल्याचे बुरुज ढासळे आहेत त्याकडे लक्ष द्या पर्यटकांना किल्ल्यात सहज चालता यावे यासाठी मार्ग तयार करा आदी स्वरूपाच्या सूचना उपस्थित अधिकारी वर्गाला दिल्या.

पदमदुर्ग किल्ल्यावर पदमदुर्ग जागर हा कार्यक्रम २५ डिसेम्बर रोजी होतो यासाठी एक दिवस या सोहळ्यासाठी मिळावा अशी मागणी पर्यटन महोत्सव समितीच्या अध्यक्षा कल्पना पाटील यांनी केली यावर आपण तसे लेखी निवेदन द्यावे आम्ही पुरातत्व खात्याचे अधिकारी याना पत्र देतो त्यामुळे सदरचा सोहळा करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. असे आश्वासन यावेळी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!