क्रिडा व मनोरंजन

महाड मोबाईल असोसिएशन आयोजित व्यापारी प्रीमियर लीग आनंदमय वातावरणात संपन्न

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड

महाड : दि. १४/१५ मार्च २०२४ रोजी दिवस – रात्र मर्यादित शटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा महाड येथील चांदे क्रीडांगण येथे संपन्न झाली.

या स्पर्धामध्ये एकूण २१ असोसिएशन ने सहभाग घेतला होता, प्रथम क्रमांक. हॉटेल & चायनीज असोसिएशन, द्वितीय क्रमांक. कन्फेशनरी & पान असोसिएशन, तृतीय क्रमांक. व्हेजिटेबल & फ्रुट असोसिएशन, चतुर्थ क्रमांक. महाड शहर किराणा असोसिएशन, मन ऑफ द सिरीज – हॉटेल & चायनीज असोसिएशन तहा चीचकर, बेस्ट बॅटसमन – हॉटेल & चायनीज असोसिएशन मधील निलेश अंबावले, बेस्ट बॉलर – कन्फेशनरी & पान असोसिएशन मधील अंकित जाधव.

महाड मोबाईल असोसिएशन आयोजित व्यापारी प्रीमियर लीग या स्पर्धेचे उद्घाटन महाड नगरपालिकेच्या माजी नगरअध्यक्षा स्नेहल जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे आमदार भरतशेठ गोगावले, रा.शि.प चे अध्यक्ष नाना जगताप, बिपिन म्हामुनकर, चेतन उतेकर, महाड नगर परिषद मुख्यधिकारी धनंजय कोळेकर, महाड पोलिस निरीक्षक तडवी, सर्व प्रशासकीय अधिकारी, विविध पक्षांचे प्रमुख नेते, महाडचे सर्व मान्यवर डॉक्टर आणि जेष्ठ व्यापारी उपस्थित होते.

तसेच ह्या स्पर्धा करिता पंच म्हणून बंटी जाधव आणि मुन्ना जाधव होते, समालोचक म्हणून हर्षल मुंढे (रोहा) आणि परेश गांधी हे होते.

ही स्पर्धा यशस्वी होण्याकरिता ज्यांनी मेहनत घेतली ते मोबाईल असोसिएशन चे अध्यक्ष निलेश यादव, सल्लागार संजय मेहता, सचिन चांदोरकर, स्पर्धा प्रमुख प्रविण चांदोरकर तसेच असोसियशन चे सर्व सभासद यांचा मोलाचा सहभाग होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!