जिल्हा

जागतिक महिला दिनानिमित्त वरसोली बीच समुद्र किनारी महिलांकरिता पारंपारिक खेळाचे आयोजन

बंटी पाटील – तालुका प्रतिनिधी अलिबाग 

रायगड : दि.9 आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड,नेहरू युवा केंद्र अलिबाग,प्रिझम सामाजिक संस्था अलिबाग, श्रीबाग लायन्स क्लब अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे तथा अध्यक्ष जिल्हा क्रीडा परिषद रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांकरिता पारंपारिक खेळाचे आयोजन वरसोली बीच समुद्र किनारी येथे दि. 8 मार्च 2023 रोजी सायंकाळी 4 वाजेपासून करण्यात आले होते.

या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून रायगड जिल्हा कृषी अधीक्षक श्रीमती उज्वला बाणखेले, ॲड.नेहा राऊत, ॲड.कलाताई, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेत्या श्रीमती तपस्वी गोंधळी, नेहरू युवा केंद्र अलिबाग चे समन्वयक श्री निशांत रौतेला, श्रीमती प्राची जोशी, श्रीमती प्राजक्ता कोकणे, श्रीमती सुचिता साळवी, श्रीमती मनीषा मानकर, श्री.सचिन निकम, श्री.संदीप वांजळे, अलिबाग पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री प्रकाश सोनवडेकर, सिद्धार्थ खंडाळे, वरसोली ग्रामपंचायत चे सदस्य महिला, महिला, विद्यार्थिनी आदी संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले यांनी सकस आहार, आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षांतर्गत “सकस धान्य व त्याचे लाभ” याबाबत उपस्थित महिलांना माहिती दिली व त्याचे महत्त्व पटवून दिले.

यावेळी महिलांनी चकरी टायर चालवणे, लगोरी, कांदा फोडी, फुगडी, मामाचे पत्र, दोर उडी या पारंपरिक खेळांचा आनंद घेतला. प्रातिनिधिक स्वरूपात महिलांचा साडी देऊन सत्कार करण्यात आला..

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!