जिल्हा

महाराष्ट्रात यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन, मान्सून यंदा 31 मे रोजीच केरळात दाखल

 

भरत पवार – शहर प्रतिनिधी नालासोपारा

मुंबई : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून मान्सून यंदा 31 मे रोजीच केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर मान्सून महाराष्ट्रातदेखील मान्सून वेळेवर दाखल होणार असून साधारणपणे 7 जून रोजी तळकोकणात मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी राज्यात मान्सून चार दिवस उशीराने म्हणजे 11 जून रोजी दाखल झाला होता. यंदा मात्र 7 जून रोजी दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 19 मे रोजी दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी मान्सून 4 जून रोजी दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात मात्र मान्सून 4 दिवस उशिराने म्हणजेच 8 जून रोजी केरळात दाखल झाला होता. तर राज्यात 11 जून रोजी मान्सूनचं आगमन झालं होतं. आता यंदा मान्सून दिलेल्या अंदाजाप्रमाणे दाखल होतो का हे पहावं लागेल.

राज्यात काही दिवस अवकाळी पाऊस पडणार, विविध मॉडेल्स आणि हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जून महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा केरळात मान्सून 31 मे रोजी दाखल होण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. तर पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस दिसेल असं सांगण्यात आलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!