जिल्हा

यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजन करावे – जिल्हाधिकारी किशन जावळे

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

रायगड दि. 17 -शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाचे दुर्गराज रायगड येथे तारखेनुसार ६ जून व तिथीनुसार २० जून रोजी आयोजन करण्यात येणार आहे.मागच्या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळा साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्याने येथील कार्यक्रमाला शिवप्रेमी नागरिकांची लाखोच्या संख्येने उपस्थिती होती. यंदा होणाऱ्या कार्यक्रमांची पूर्वतयारी करताना संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.

रायगड किल्ला येथे शिवराज्याभिषेक सोहळा 2024 च्या अनुषंगाने नियोजन बैठक संपन्न झाली यावेळी जिल्हाधिकारी श्री जावळे बोलत होते बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घागें, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बस्तेवाड , अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एन आर नामदे, राष्ट्रीय महामार्ग चे कार्यकारी अभियंता दिलीप चौरे, पोलीस उपअधीक्षक एस बी काळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवमाने, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.देवकाते यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री जावळे म्हणाले शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक रायगड येथे येत असतात या वर्षी होणाऱ्या सोहळा कार्यक्रमांसाठी आयोजकांकडून तयारी केली जात आहे. मागील वर्षी १५ हजार व्यक्तींची क्षमता असलेल्या गडावर अडीच लाखापेक्षा जास्त जण आल्यामुळे सुरक्षा व पायाभूत सुविधांवर मोठा ताण निर्माण झाला होता . हा अनुभव लक्षात घेऊन या वर्षी कोणतीही समस्या उद्भवू नये या दृष्टीने आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी पूर्वतयारी केली जावी. येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांचे पार्किंग, पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता तसेच या कालावधीत आवश्यक असणाऱ्या विविध सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी सूक्ष्म नियोजन करून कार्यवाही करावी असे जिल्हाधिकारी यांनी सुचित केले.

पोलीस अधीक्षक श्री. घार्गे यांनी महाड व माणगाव मार्गे येणाऱ्या खाजगी वाहनांच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी रस्त्यांची कामे, पार्किंगच्या जागा व तेथून गडाकडे जाणाऱ्या मार्गाची व्यवस्था संबंधित विभागांनी पूर्ण करावे तसेच आवश्यक ते माहिती देणारे फलक लावले जावेत असे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!