जिल्हा

पावसाळी हंगामात मांडवा-गेटवे प्रवासी जलवाहतूक २६ मे ते ३१ ऑगस्टदरम्यान सेवा राहणार बंद

अनिकेत मोहित – शहर प्रतिनिधी श्रीवर्धन

आय. व्हि. अॅक्ट १९१७ अन्वये पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया या जलमार्गावरील प्रवासी वाहतूकसेवा दिनांक २६ मे २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संबंधित प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पावसाळ्यात समुद्रातील प्रतिकूल हवामान, भरती–ओहोटी तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असूनसंबंधित कंपनी व संस्थांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या कालावधीत मांडवा–गेटवे मार्गावरील जलवाहतूक पूर्णपणे बंद राहणार असल्याने प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापरकरावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!