अखिल बुरूड समाज प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या विशेष सर्वसाधारण सभेत समाजहिताचे महत्त्वपूर्ण ठराव मंजूर

रोहा प्रतिनिधी ( अक्षता जामकर )
अखिल बुरूड समाज प्रतिष्ठान महाराष्ट्र या समाजसेवी संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा शुक्रवार, दि. 26 जून रोजी नेरळ (कर्जत) येथील सुमन रिसॉर्ट फार्महाऊस येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेच्या निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रमाचेही आयोजनकरण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस सुमारे 90 टक्के सभासद उपस्थित होते. कोरम पूर्णझाल्यानंतर महासचिव श्री. प्रकाश माने यांनी प्रास्ताविक केले. खजिनदार राजेंद्र नागे यांनी संस्थेचा 31 मार्च 2026 अखेरचालेखापरीक्षित आर्थिक अहवाल सभेपुढे सादर केला. हा अहवाल सभेने एकमताने मंजूर केला. सभेदरम्यान संस्थेच्याआचारसंहितेबाबत प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शिस्तबद्ध, पारदर्शक आणि उत्तरदायी कार्यपद्धतीवर विशेष भरदेण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र शासनाच्या अनुसूचित जातींच्या वर्गीकरणासंदर्भातील निर्णय प्रक्रिया तात्काळ थांबवून विद्यमान संवैधानिकआरक्षण कायम ठेवण्याची मागणी संबंधित मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
सहसचिव अशोक खैरे यांनी संस्थेच्या सुधारित घटनेचे वाचन केले. गजानन नागे यांनी काही सुधारणा सुचविल्यानंतर विस्तृत चर्चेतूनसुधारित घटना बिनविरोध मंजूर करण्यात आली. तसेच संस्थेच्या नावात क्षेत्रीय ओळख अधोरेखित करण्यासाठी “महाराष्ट्र” हा शब्दसमाविष्ट करण्यासही सभेची मान्यता मिळाली.
भोजनानंतर झालेल्या दुसऱ्या सत्रात युवा कार्यकर्ते व पदाधिकारी अशोक पवार, अनिल वारलेकर, किशोर गायकवाड, शरद तेवरे, सिद्धेश गायकवाड, सोमनाथ पवार आदींनी वनक्षेत्रात बांबू व विविध फळझाडांची लागवड केली. राजेंद्र सोनवणे यांनी वृक्षारोपणाचेमहत्त्व शेर–शायरीच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडत उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. सौ. स्नेहल नागे, सौ. अलका पवार, गजानन नागे व किशोर गायकवाड यांनीही समयोचित विचार व्यक्त केले.
दुसऱ्या सत्रात इतिवृत्त लेखन, ठरावांचे वाचन, नवीन सभासद अर्ज, वर्गणी तसेच संस्थेच्या भावी उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यातआला. आगामी काळात शैक्षणिक मदत, कायदेशीर सल्ला, आरोग्य शिबिरे, महिला सक्षमीकरण, स्वच्छता मोहिमा आदीसमाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे ठराव मंजूर करण्यात आले.
अध्यक्षीय समारोपात आबासाहेब पवार यांनी सभेचा आढावा घेत सर्व उपस्थितांचे आभार मानले. महासचिव प्रकाश माने यांनीसूत्रसंचालन केले. यावेळी वकिली परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल राजेंद्र नागे यांचा स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
सायंकाळी राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.



