जिल्हा
रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे अमृत महोत्सवी दौड 10 कि.मी. कार्यक्रमाचे आयोजन
विशाल मोहिते – शहर जिल्हा प्रतिनिधी रायगड
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे अमृत महोत्सवी दौड (10 कि.मी.) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस उपअधीक्षक जगदीश काकडे, तहसिलदार (महसूल) सचिन शेजाळ, पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, विश्वजित काईंगडे, शैलेश सणस व इतर पोलीस अधिकारी–कर्मचारी उपस्थित होते.



