दक्षिण रायगड वकील चषक स्पर्धा संपन्न / पहिल्या पर्वाचे विजेते ठरले महाड वकील संघ
सचिन चांदोरकर – तालुका प्रतिनिधी महाड
महाड दि. 11 वर्षाच्या बारा महिने सुरु असलेल्या धकाधकीच्या जीवनातून एक दिवसाचा विरंगुळा म्हणून माणगाव वकील बार आयोजित दक्षिण रायगड वकील क्रिकेट स्पर्धेत महाड वकील बार संघ विजयी ठरला तर माणगाव वकील बार ह्या संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.
माणगाव कोर्टाच्या शेजारी साबळे कॉलेज मैदानावर आयोजित दक्षिण रायगड वकील क्रिकेट स्पर्धे मध्ये महाड, माणगाव, श्रीवर्धन, पाली संघाने प्रवेश घेतला होता. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या स्पर्धे मध्ये महाड वकील बार संघाने माणगाव वकील बार संघावर अंतिम सामन्यात मात करत पहिल्या पर्व चे विजेतेपद् पटकविले. तसेच तृतीय क्रमांका साठी झालेल्या सामन्या मध्ये पाली वकील बार संघाने श्रीवर्धन वकील बार संघावर मात केली.
ह्या स्पर्धे मध्ये अंतिम सामन्यासाठी सामनावीर म्हणून महाड संघाच्या ऍड. सचिन गायकवाड यांची निवड करण्यात आली, तर स्पर्धेतील अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या महाड सांघाच्या ऍड. रोहन मेहता यांना मालिकावीर खिताब देऊन गौरविण्यात आले.
पुढच्या वर्षी ह्या स्पर्धा ही महाड च्या चांदे क्रिडांगणावर अतिशय भव्य दिव्य स्वरूपात भरविल्या जातील अशी माहिती महाड वकील संघाकडून देण्यात आली.

