क्रिडा व मनोरंजन
तळा तालुक्यातून ज्ञानदा उत्सुरे वकृत्व स्पर्धेत प्रथम
सूरज पुरारकर - तालुका प्रतिनधी तळा
शिवजयंती निमित्त दुसरी राज्यस्तरीय ऑनलाईन वकृत्व स्पर्धा घेण्यात आली होती, या स्पर्धेत तळा येथील इयत्ता पहिली ची विद्यार्थिनी ज्ञानदा गहिनीनाथ कस्तुरे हिने तळा तालुक्यातून पहिला तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून तिसरा क्रमांक पटकाविला आहे.

या दरम्यान पहिली ते पाचवी पर्यंतच्या गट क्रमांक एक मध्ये राज्यातून असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता, स्पर्धेचा विषय होताकि रयतेचा राजा ज्ञानदा रायगड जिल्हा परिषदेच्या तळा शाळेची विद्यार्थिनी आहे, मागील दोन वर्ष कोरोना काळापासून शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने वकृत्व स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीने शाळा फाऊंडेशनचे संस्थापक प्रतापसिंह मोहिते यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. यामुळे तिचे सर्वांकडून कौतुक होताना दिसत आहे.


