रोह्यात पेट्रोलचा तुटवडा, पेट्रोल पंपावर लागल्या लांबच लांब रांगा

रोहा प्रतिनिधी (अक्षता जामकर)
रोहा तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण रायगड जिल्ह्यातपूरपरिस्थिती निर्माण झाली असून अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणीपाणी साचल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
रोहा नागोठणे रस्त्यावर भिसे खिंडीत झाड कोसळून आणि मोठ्याप्रमाणात माती रस्त्यावर आल्याने तो रस्ता देखील बराच काळवाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.
जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे रोहा शहरात पेट्रोलचा तुडवडा निर्माण होऊन अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल नसल्यानेदुचाकीस्वारांना परत जावे लागत होते. रोहा शहरातील अष्टमी येथील एच पी पेट्रोलियम चे अधिकृत वितरक असलेले देशमुखपेट्रोलियम च्या पेट्रोल पंपावरच पेट्रोल मिळत असल्याने दिवसभर या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी दुचाकीस्वारांच्या लांबच लांबरांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या.
पेट्रोलसाठी रांगेत उभे असताना काही दुचाकीस्वारांमध्ये तुरळक वादावादी पाहायला मिळाली.
लवकरच रोहा शहरातील पेट्रोलचा तुटवडा दूर होऊन वाहनचालकांना दिलासा मिळेल अशी आशा रोहेकरांनी व्यक्त केली आहे.



