जिल्हा

सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या मदत आणि बचाव कार्याची रोहा तहसिलदारांकडून दखल

रोहा प्रतिनिधी ( अक्षता जामकर)

रोहा दिनांक ७ जुलै मागील चार दिवसांपासून रोहा तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात अतिरुष्टीने मोठ्या प्रमाणात जनजीवनविस्कळीत झाले होते. कुंडलिका नदीवर भिरा येथे असलेल्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने रविवारीरात्री कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडून रोहा शहराच्या बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात हाहाकारउडाला. या आपत्कालीन परिस्थितीत रोहा नगरपरिषदेच्या लोकप्रतिनिधी, प्रशासकीय कर्मचारी आणि रोहा तहसीलदारकार्यालयासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रात्रभर जागून मदत आणि वाचवा कार्यात हिरहिरीने सहभाग घेतला.

     

सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सागर दहिंबेकर यांच्या सह त्यांचे सहकारी यांनी योग्य नियोजन, प्रशिक्षिततरुण, आधुनिक उपकरणे, धाडस आणि अनुभव यांचा अनोखा संगम दाखवून या बचाव कार्यात महत्वाची भूमिका बजावली. सागरदहिंबेकर आणि त्यांच्या सहाऱ्यांनी दाखविलेल्या धाडस, नियोजन आणि बचाव मोहिमेतील त्यांचे योग्य नियोजन यांची दखल घेऊनरोहा उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांनी त्यांना आपल्या कार्यालयात बोलावून त्यांच्या कार्याचा गौरव केला असून, संस्थेला येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. आपल्या संस्थेच्या या सामाजिक कार्याची माहिती शासनदरबारी पोहचविण्याचेआश्वासन देऊन. भविष्यात आपल्या कार्यालयाकडून योग्य ती मदत निश्चित केली जाईल असे आश्वासन देण्यात आले.

सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या सदस्यांचा रोहा तहसीलदारांच्या कार्यालयात गौरव.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!