क्रिडा व मनोरंजन

जय हनुमान नवेनगर ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत मोहप्रे इलेव्हन संघ विजेता

तरुणांबाबतचे माणिकराव जगताप यांचे स्वप्न साकार करणार - श्रीयश जगताप

 

सचिन चांदोरकर – ग्रामीण प्रतिनिधी महाड

महाड दि. 13 एप्रिल जय हनुमान नवेनगर आयोजित ओव्हर आर्म टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत मोहप्रे इलेव्हन संघ विजेता ठरला तर प्रेम इलेव्हन नडगाव संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले ही स्पर्धा काँग्रेसचे युवा नेते हनुमंत जगताप यांच्या मार्ग दर्शनाखाली पार पडली.

कै. माणिकराव जगताप क्रिडा नगरी नवेनगर महाड येथे दि  ७ ते १० एप्रिल दरम्यान ओव्हरआर्म टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आल होते. या स्पर्धे मध्ये एकुण ३२ संघाना प्रवेश देण्यात आला होता तर २४ वर्षाखालील संघालाही या स्पर्धेत खेळण्याची संधी देण्यात आली होती.

दरम्यान या स्पर्धेचे बक्षिस वितरण श्रीयश माणिक जगताप सरचिटणीस प्रदेश विद्यार्थी काँग्रेस कमिटी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी आपले वडील माजी आमदार कै. माणिक जगताप यांनी तरुणांबाबत ज्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या त्यापूर्ण करण्याच अभिवचन श्रीयश यांनी यावेळी तरुणांना मार्गदर्शन करतांना व्यक्त केल.

माणिकराव स्वतः एक मैदानी खेळाडू होते, त्यांनी आपल्या कारकिर्दित अँथलिटिक्स स्पर्धेत इंटर कॉलेज स्पर्धेत प्राविण्य मिळवल होत यामुळे ते कायम तरुणानां आपल्या मध्ये पहात असत, महाड सारख्या शहरांत तरुणांसाठी एक सुसज्य मैदान बनवण्याची त्यांची तिव्र इछा होती ती आम्ही साक्षात उतरवणार असल्याच श्रीयश जगताप यांनी सांगितल.

यावेळी व्यासपिठावर राजूशेठ कोरपे अध्यक्ष महाड तालुका कॉंग्रेस, जगदिश पवार सरचिटणीस रायगड जिल्हा काँग्रेस, माजी नगरसेवक प्रमोद महाडीक, मयुरी शेडगे, रश्मी बाईत, शांताराम सुतार, गजानन काप, महेश शेडगे, राजू बाईत, अमर शेडगे, मुन्ना कदमआदी उपस्थित होते.

यास्पधैत तृतीय क्रमांक बिरवाडी संघानी पटकावला, प्रथम क्रंमाक २० हजार रोख रक्कम आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक १५ हजार वचषक, तृतीय १० हजार चषक प्रत्येक मॅचला मॅन ऑफ दि मॅच टिशर्ट, अंतिम मॅचचा मॅन ऑफ दि मॅच दर्शन शेडगे, स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज विजय मांडे, उत्कृष्ट गोलंदाज रोहित दरेकर, मॅन ऑफ द सिरीज दर्शन शिर्के यांना गौरविण्यात आले.

या स्पर्धेत पंच म्हणून राहुल सकपाळ, अमर शिंदे, मुन्ना कदम यांनी पाहिल तर समालोचन अजित अवसरे, संदिप गायकवाड, मयूरसाळवी, यांनी केले ही स्पर्धा यशस्वि करण्या करिता महेश शेडगे, राजू बाईत, अमर शिंदे, हर्षल चिवीलकर, मुन्ना कदम, गणेश फोपलकर, राहुल सकपाळ, वैभव साळवी, विजय साळवी आदिनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!